PromotionShop & Outlet Promotion Reel

The Momo Katta — momo shop promotion reel, Pune

पुणे शहरातून थेट नऱ्हेला — फक्त मोमोजसाठी. The Momo Katta चे चिकन फ्राइड पेरी पेरी आणि व्हेज कॉर्न पेरी पेरी मोमोज ट्राय केले, आणि चव खरंच भारी होती.

The Momo katta Pune 2026-08-28

Quick details

Client
The Momo katta
Business
Momo / Street Food
City
Pune
Service
Shop & Outlet Promotion Reel
Platform
Instagram
Published
2026-08-28

Delivered

  • 1 Reel
  • Shot on location
  • Marathi caption and on-screen text
Want one like this?

The Momo katta बद्दल

मोमोजसाठी एवढं लांब जायचं का? — हा प्रश्न निघतानाच डोक्यात होता. पण नऱ्हेच्या The Momo Katta बद्दल इतकं ऐकलं होतं की एकदा जाऊन बघायचंच ठरवलं. पुणे शहरातून निघालो, पारी कंपनी रोड धरला, आणि जाधवर स्कूलच्या शेजारी, पिराजी नगरमध्ये हे छोटंसं मोमोज सेंटर सापडलं.

पहिली गोष्ट जी जाणवते ती म्हणजे वाफ. बास्केट उघडली की समोर धूर, आणि तिथेच अर्धी भूक लागते. जागा मोठी नाही — रोडवरचं साधं काउंटर आहे. पण गर्दी बघूनच कळतं की इथे काहीतरी खरं आहे.

सुरुवात केली चिकन फ्राइड पेरी पेरी मोमोजने. बाहेरून कुरकुरीत तळलेले, वरून पेरी पेरी मसाला — तिखट आहे, पण जिभेला झोंबणारा तिखटपणा नाही. आतलं चिकन सारण रसदार, आणि मोमोचं पीठ जाड नाही, हे महत्त्वाचं. फ्राइड मोमोज बऱ्याच ठिकाणी कडक आणि कोरडे लागतात — इथे तसं झालं नाही.

मग व्हेज स्पेशल मोमोज घेतले, आणि शेवटी व्हेज कॉर्न पेरी पेरी. कॉर्नवाले सगळ्यात वेगळे वाटले — गोडसर कॉर्न आणि तिखट पेरी पेरी मसाला यांचं कॉम्बिनेशन छान जमून आलंय. व्हेज खाणाऱ्यांसाठी हा इथला बेस्ट ऑप्शन आहे असं वाटतं.

सोबतची लाल चटणी पण घरची वाटते, विकतची नाही. आणि रेट बघता, नऱ्हे-धायरी भागात राहणाऱ्यांसाठी हे रेग्युलर ठिकाण होऊ शकतं.

📍 पत्ता: नऱ्हे रोड, पिराजी नगर, पारी कंपनी रोड, जाधवर स्कूल शेजारी, पुणे – 411041

हे रील The Momo Katta कोलॅबोरेशन होतं. सातारकर LIVE वर पोस्ट केल्यावर १३,००० हून जास्त views, २२० likes, ८५ comments आणि ५४ saves मिळाले — त्यातले saves सगळ्यात महत्त्वाचे, कारण save करणारा माणूस खरंच जायचं ठरवतो.

Get one made for your business

Same process, your shop. Written quote back, usually the same day.

Small budget is fine — say it honestly and you still get a straight answer.